Wednesday 9 August 2017

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णय अंतिम करण्यासाठी अभिप्राय



वृत्तपत्र टिप्पणी
विषय : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णय अंतिम करण्यासाठी अभिप्राय
अहमदनगर : महाराष्ट्र राज्यातील नामवंत, सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजन सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणलेली आहे. तसेच जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले वर्चस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा जेष्ठ क्रीडा महर्षिंचा गौरव करण्यासाठी सन २००१-०२ पासून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणली आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक/कार्यकर्ते), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, विशेष पुरस्कार व जिजामाता पुरस्कार या पुरस्कारांची नियमावली दि.०१ ऑक्टोबर, २०१२ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली असून, या पुरस्कार नियमावलीमध्ये काळानुरुप आणखी काही बदल आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये अधिक पारदर्शीपणा येणे, विविध खेळांच्या स्पर्धांचा समावेश, खेळ निहाय गुणांकन आवश्यक असल्याने, सुधारीत नियमावली तयार करण्यासाठी एकविध खेळांच्या राज्य संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कारार्थी यांच्या सूचना, मत क्रीडा व युवक सेवा संचालनालयास मागविण्यात आलेले होते, तसेच याबाबत विविध बैठकांचे आयोजन करुन, प्राप्त झालेल्या सूचनांचे संकलन करुन त्या विचारात घेऊन, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये सुधारणांचे प्रारुप तयार करण्यात आलेले असून, सदरचे प्रारुप शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या https://education.maharashtra.gov.in/nfsshare/admin/news_update/1501845255_shiv_chhtrapati_new.pdf या संकेतस्थळावर दि.१३ ऑगस्ट, २०१७ पर्यंत उपलब्ध आहे.
            राज्यातील सर्व नागरिक, एकविध खेळांच्या राज्य संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, क्रीडा तज्ञ, क्रीडा प्रेमी, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते, साहसी क्रीडा प्रकाराचे खेळाडू व आयोजक, पॅरालिम्पिक खेळांच्या राज्य संघटना व दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी यांना विनंती करण्यात येते की, सदरचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे प्रारुप पाहून, त्यावर आपले अभिप्राय, सूचना, सुधारणा दि.२१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत dsysdesk14@gmail.com किंवा dsoahmedanagar01@gmail.com या इ-मेल वर पाठविण्यात याव्यात.

No comments: