Wednesday 23 January 2019

जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१८


जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१८
            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीवर नियुक्त मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर, प्रा.सुनिल जाधव (शिवछत्रपती पुरस्कारार्थी) प्रा.संजय साठे (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ) या निवड समिती सदस्यांमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून सन २०१८ करिता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थींची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रु.१०,०००/- असे आहे.
सन २०१8 च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे:  (एकूण पाच)
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग )
è अदित्य संजय धोपावकर (ज्युदो) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
सन २०१४-१५ मधील राष्ट्रीय युवा स्पर्धेत सहभाग तसेच २०१७ -१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय ज्युदो अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग तसेच  कनिष्ठ राष्ट्रीय ज्युदो अंजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी. तसेच त्याने अनेक वरिष्ठ व कनिष्ठ राज्य व शालेय, जिल्हा स्पर्धेंमध्ये प्राविण्य संपादनाची कामगिरी केलेली आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग )
è कु.प्रणिता प्रफुल्ल सोमण (सायकलींग ) :  सन २०१७-१८ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय सायकलींग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ३ सुवर्णपदके, व १ रौप्यपदक संपादन केलेले आहे.  तसेच तिने अनेक वरिष्ठ व कनिष्ठ राज्य व शालेय, जिल्हा स्पर्धेंमध्ये प्राविण्य संपादनाची कामगिरी केलेली आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (दिव्यांग प्रवर्ग )
è श्री सय्यद अस्मिरोद्दीन रफियोद्दीन ( पॅरा पॉवरलिफ्टींव व अ‍ॅथलेटिक्स). : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत  दिव्यांग खेळाडू पुरस्कारार्थी.
            सन २०१४-१५  व २०१५-१६ मध्ये वरिष्ठ पॅरा पॉवरलिफ्टींग  राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत कास्यपदके. सन २०१६-१७ मध्ये वरिष्ठ राज्य पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक तसेच सन २०१७-१८ मध्ये वरिष्ठ पॅरा पॉवरलिफ्टींग  राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत कास्यपदक.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
è श्रीमती शुभांगी सुधाकरराव रोकडे ,धनुर्विद्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
            अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनुर्विद्या खेळाचे खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्यांनी अनेक विविध स्तरावरील खेळाडू निर्माण केलेले आहेत. यामध्ये सूरज दळवी, अभिजित रिंधे, सूरज खेबूडकर, साक्षी शितोळे, रोहीणी भांगे, भाग्यश्री कोलते इ. खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले आहे.

गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार :
è श्री.शैलेश रमेश गवळी : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक.
अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल, कयाकिंग, कनोईंग, टेनिस असोशिएशनच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडांगणाची निर्मिती करणे व व्यायामशाळांची उभारणी करण्यामध्ये योगदान, विविध क्रीडा संस्था स्थापन करण्यामध्ये सहभाग, अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे. क्रीडा विकासात्मक चर्चासत्रे, परिसवांद व प्रात्यक्षिके यामध्ये सहभाग.