Wednesday 24 January 2018

जिल्हा क्रीडा पुरस्का २०१७-१८

                            जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी सन २०१७-१८

   श्री.कल्पेश भागवत - गुणवंत क्रीडा मार्गदर्शक




      जिल्हा क्रीडा पुरस्कार : २०१७-१८


            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीवर नियुक्त मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर, श्री.रामदास ढमाले (शिवछत्रपती पुरस्कारार्थी) श्री.सुनिल जाधव (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ) श्री.बळीराम सातपुते (जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी) या निवड समिती सदस्यांमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून सन २०१७ -१८ करिता गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार्थींची निवड करण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये १०,०००/- असे आहे.
सन २०१७ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे:  (एकूण पाच)
गुणवंत खेळाडू पुरस्कार : (पुरुष प्रवर्ग )
 शिंदे प्रशांत रामदास (धनुर्विद्या) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत खेळाडू पुरस्कारार्थी.
सन २०१४-१५ मधील वरिष्ठ राज्य  धनुर्विद्या अंजिक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाचे मानकरी तसेच ११ व्या वरिष्ठ राष्ट्रीय धनुर्विद्या अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग. तसेच त्याने अनेक जिल्हा व राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य संपादन केले आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार : (महिला प्रवर्ग )
 कु.शिंदे स्वप्नाली भानुदास (तायक्वांदो) : अत्याराऊ (कझाकीस्तान) येथे दि.१९ ते २१ एप्रिल २०१७ या कालावधीत झालेल्या आशियाई ज्युनियर तायक्वांदो अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग व विविध राज्य राष्टीय स्पर्धेत प्राविण्य व सहभाग,आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागामुळे थेट पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
 कु.कापसे सुवर्णा राजू (ॲथलेटीक्स) : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत महिलाखेळाडू पुरस्कारार्थी.
            सन २०१२-१३  व २०१३-१४ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक.सन २०१४-१५ मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत रौप्यपदक,१२ व्या नॅशनल युथ अंजिक्यपद स्पर्धेत सहभाग,राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये सुवर्णपदक.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :
 श्री.कल्पेश चंद्रकांत भागवत: जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणानुक्रमे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी.
अहमदनगर जिल्हा कयाकिंग व कनोईंग संघटनेच्यावतीने कयाकिंग खेळाचे खेळाडूंना प्रशिक्षण देत असून, त्यांनी अनेक विविध स्तरावरील खेळाडू निर्माण केलेले आहेत. यामध्ये महेश धांबोरे, दिग्विजय कावळे,भाऊसाहेब पुरनाळे, संजय डमाळे, नितीन मासाळ,अक्षय होके  इ. खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य संपादन केलेले आहे.

गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार :
 श्री.माणीकराव सोनबा झेंडे : जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक.
अहमदनगर जिल्हा सायकलींग व डॉजबॉल असोशिएशनच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन.जिल्ह्यात विविध ठिकाणी क्रीडांगणाची निर्मीत्ती करणे व व्यायामशाळांची उभारणी करण्यामध्ये योगदान.विविध क्रीडा संस्था स्थापन करण्यामध्ये सहभाग,अनेक राज्य व राष्ट्रीय सायकलपटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे.क्रीडाविकासात्मक चर्चासत्रे,परिसवांद व प्रात्यक्षिके यामध्ये सहभाग.
---------------------------------------------------------------------------------------------