Tuesday 5 December 2017

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्‍यस्‍तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा, २०१7-१8


                      विषय :छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्‍यस्‍तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा,
                                    २०१7-१8
                                    विविध कामांच्या पुरवठा व सेवांसाठी दरपत्रके मागविणेबाबत...

अ.क्र.
कामाचे नांव
अंदाजित खर्च
आवश्यकतेबाबत तपशील
१.
निवास व्यवस्था
३.०० लक्ष
निवास व्यवस्थेसाठी गाद्या, उशा, बेडशीट, ब्लॅंकेट पुरवठा आवश्यक
२.
पंच, मान्यवर, पदाधिकारी,  निवास व्यवस्था
३.०० लक्ष
पंच, पदाधिकारी, मान्यवर यांची कर्जत शहर व जवळच्या शहरामधील लॉजवर व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्यक्ष लॉजचे दराची माहिती घेण्यात आलेली आहे, त्यांच्याशी वाटाघाटी करुन दर कमी करुन ते अंतिम करण्यात येतील.
३.
वाहतुक व्यवस्था
३.०० लक्ष
खेळाडूंची व पदाधिका-यांची वाहतुक व्यवस्थेसाठी आवश्यक वाहने
४.
पिण्याचे पाणी
१.०० लक्ष
खेळाडू, पदाधिकारी, मैदान, प्रेक्षक याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५.
ओळखपत्र
०.५० लक्ष
सुरक्षेसाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी, स्वयंसेवक, क्रीडा शिक्षक यांना या स्पर्धेचे ओळखपत्र प्रदान करणे.
६.
कार्यक्रम पत्रिका, प्रमाणपत्र इ.
०.५० लक्ष
स्पर्धेच्या उद्‌घाटन, समारोप समारंभाची कार्यक्रम पत्रिका, खेळाडू, व्यवस्थापक, पदाधिकारी, स्वयंसेवक यांना द्यावयाचे सहभाग प्रमाणपत्र

७.
ट्रॉफी व मेडल्स
२.०० लक्ष
स्पर्धेच्या नावांत बदल झालेला असल्याने, मूळ चषकामध्ये बदल करणे व मूळ चषकाच्या प्रतिकृती सहा नग तयार करणे, विजयी खेळाडूंना मेडल्स प्रदान करणे.
८.
बॅनर व फ्लेक्स
१.५० लक्ष
स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी, व्ही.आय.पी., खेळाडू, पदाधिकारी, प्रेक्षक, पत्रकार, यांच्या माहितीसाठी आवश्यकतेनुसार बॅनर्स व फ्लेक्स तयार करणे.
९.
स्टेज सजावट
२.०० लक्ष
उद्‍घाटन व समारोप कार्यक्रमासाठी स्टेजवरील फुलांची सजावट इ.
१०.
स्टेशनरी व इतर साहित्य
०.७५ लक्ष
स्पर्धेसाठी कबड्डी संघटनेच्या तांत्रिक बाबीसाठी, तसेच कार्यालयासाठी आवश्यक असणारी स्टेशनरी व इतर साहित्य. तसेच खेळाडूंच्या निवास सुविधेच्या ठिकाणी स्नान व स्वच्छतागृहासाठी आवश्यक असणा-या बादल्या, मग इ.
११.
स्वयंसेवक/मजूर, स्वच्छक, स्वच्छक एजन्सी (हाऊसकिपींग) इ. नियुक्ती
२.०० लक्ष
या स्पर्धेसाठी विविध कामे करण्यासाठी मजूर, वसतिगृह, तसेच घॆण्यात आलेल्या सदनिका इ. ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी सदर बाब आवश्यक आहे. तसेच मैदानावर आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची कामे करण्यासाठी ही बाब आवश्यक आहे.

Thursday 16 November 2017

जिल्हास्तर गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार

वॄत्तपत्र टिप्पणी
जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१
जिल्हास्तर गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.राक्रीधो-२०१२/प्र.क्र.१५८/१२/क्रीयुसे-२, दि.१६ ऑक्टोबर, २०१७ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख रु.१०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१) एशियन गेम्स, २) कॉमनवेल्थ गेम्स ३) जागतिक चषक क्रीडा स्पर्धा (सर्व गट) ४) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट), ५) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट) व इ) युथ ऑलिम्पिक गेम्स, युथ कॉमनवेल्थ गेम्स, युथ जागतिक अजिंक्यपद/युथ जागतिक चषक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात यावा, असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,टिळक रोड,अहमदनगर येथे  कार्यालयीन कामकाजाचे दिवशी (सुट्टीचे दिवस वगळून)  दि.२० डिसेंबर, २०१७ पर्यंत उपलब्ध असतील व सीलबंद अर्ज दि. २५ डिसेंबर २०१७ रोजी सांय.४.०० वाजेपर्यंत सादर करावेत, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. सदर बातमी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsoahmednagar.blogspot.in ब्लॉगवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर दुरध्वनी क्रं.०२४१-२४७०४१५ येथे संपर्क साधावा.

००००००

Monday 13 November 2017

आंतरशालेय बॅंड स्पर्धा.

केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत पश्चिम विभागीय बॅंड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे पत्र व स्पर्धेच्या अटी खालील नमूद केलेल्या पत्रात दिलेल्या आहेत.





वरील नमूद पत्रातील अटींची पूर्तता करणा-या शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दि.१५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत नोंद करावी. या आंतरशालेय बॅंड स्पर्धाच्या राज्यस्तरीय स्पर्धा दि.१८ नोव्हेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विहीत मुदतीत या स्पर्धांसाठी आपली प्रवेशिका द्यावी, अशी विनंती आहे.


Tuesday 3 October 2017

पुणे विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा, २०१७-१८

पुणे विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा, २०१७-१८
परिपत्रक


अहमदनगर शहरस्तर बुद्धीबळ स्पर्धा, २०१७-१८

१४ वर्षाखालील मुलांच्या बुद्धीबळ स्पर्धांचे पुनश्च आयोजन करण्यात येणार असून, या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी सहभागी होणे आवश्यक आहे.


Saturday 2 September 2017

बॉक्सिंग, ज्युडो, कराटे, तायक्वांदो, वेटलिफ्टींग, कुस्ती व वुशू सुधारीत वजनगट


भारतीय शालेय खेळ महासंघाचे परिपत्रक क्र.SGFI/0682/17-18, दि.०१ सप्टेंबर, २०१७ नुसार शालेय क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंग, ज्युडो, कराटे, तायक्वांदो, वेटलिफ्टींग, कुस्ती व वुशू या क्रीडा स्पर्धांच्या १७ व १९ वर्षाखालील वयोगटांच्या वजनगटामध्ये सुधारणा केलेली आहे. या सुधारीत वजनगटानुसार आगामी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या स्पर्धांबाबतीत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.







Monday 21 August 2017

शालेय क्रीडा स्पर्धांमधील समाविष्ट खेळ, वयोगट, वजनगट आणि बाबी इ.तपशील




अत्यंत महत्वाची सूचना :  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे पत्र क्र.क्रीयुसे/राक्रीस्पआ/२०१७-१८/का-४, दि.१९.०८.२०१७ अन्वये, सन २०१७-१८ या कार्यालयाने प्रकाशित केलेली माहिती व नियमावली पुस्तिकेतील प्रकरण-पाच मधील समाविष्ट खेळांच्या यादीमध्ये बदल करण्यात येत असून, तो खालील प्रमाणे राहील. सदर पत्रानुसार सन २०१७-१८ या वर्षात केवळ खालील क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येतील.  
प्रकरण क्र. : पाच

शालेय क्रीडा स्पर्धांमधील समाविष्ट खेळ, वयोगट, वजनगट आणि बाबी इ.तपशील
नियम क्र.५.१ : शासन, भारतीय शालेय खेळ महासंघ/क्रीडा व युवक सेवा संचालनालय (सक्षम प्राधिकरण) द्वारा मान्यता प्राप्त मुला-मुलींसाठी खेळ  व वयोगट यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
खेळाचे नांव
वयोगट व मुले-मुली
भा.शा.खे.म. द्वारा वर्गीकरण
धनुर्विद्या
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
मैदानी स्पर्धा
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
बॅडमिंटन
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
बॉक्सिंग
१४ मुले,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
हॉकी
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
टेनिस
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
शुटींग
१९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
कुस्ती (फ्रीस्टाईल)
१४ मुले,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
कुस्ती (ग्रीको-रोमन)
१४ मुले,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
वेटलिफ्टींग
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
उच्च प्राधान्य
४.
बास्केटबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१०
बुद्धीबळ
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
११
सायकलिंग
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१२
फूटबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१३
जिम्नॅस्टिक्स
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१४
ज्युडो
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१५
व्हॉलीबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१६
टेबल-टेनिस
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१७
तायक्वांदो
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१८
जलतरण व डायव्हिंग
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
१९
वॉटरपोलो
१९ वर्षाखालील मुले
प्राधान्य
२०
कबड्डी
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
२१
स्क्वॅश
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
२२
वुशू
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
प्राधान्य
२३
तलवारबाजी
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२४
हॅण्डबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२५
खो-खो
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२६
बॉलबॅडमिंटन
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२७
कॅरम
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२८
नेटबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
२९
बेसबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३०
सॉफ्टबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३१
रोलबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३२
कराटे
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३३
शुटींग बॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३४
स्केटींग (स्क्वाड व इनलाईन रेसेस)
११,१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
इतर
३५
रोलर हॉकी
१९ वर्षाखालील मुले
अवर्गीकृत
३६
क्रिकेट
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले
अवर्गीकृत
३७
किक बॉक्सिंग
१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
अवर्गीकृत
३८
मल्लखांब
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
अवर्गीकृत
३९
योगा
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
अवर्गीकृत
४०
डॉजबॉल
१९ वर्षाखालील मुले व मुली
अवर्गीकृत
४१
स्क्वाय मार्शल आर्ट
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
अवर्गीकृत
४२
थ्रोबॉल
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली

४३
सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा
१५ व १७ वर्षाखालील मुले व मुली
इतर क्रीडा स्पर्धा
४४
नेहरु हॉकी
१४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुले व मुली
इतर क्रीडा स्पर्धा