Thursday 16 November 2017

जिल्हास्तर गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार

वॄत्तपत्र टिप्पणी
जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१
जिल्हास्तर गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.राक्रीधो-२०१२/प्र.क्र.१५८/१२/क्रीयुसे-२, दि.१६ ऑक्टोबर, २०१७ अन्वये जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप रोख रु.१०,०००/-, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे, दरवर्षी अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला), यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१) एशियन गेम्स, २) कॉमनवेल्थ गेम्स ३) जागतिक चषक क्रीडा स्पर्धा (सर्व गट) ४) आशियाई अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट), ५) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (सर्व गट) व इ) युथ ऑलिम्पिक गेम्स, युथ कॉमनवेल्थ गेम्स, युथ जागतिक अजिंक्यपद/युथ जागतिक चषक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना थेट पुरस्कार देण्यात यावा, असा पुरस्कार ज्यादाचा पुरस्कार समजण्यात यावा, असेही शासन निर्णयात नमूद आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क,टिळक रोड,अहमदनगर येथे  कार्यालयीन कामकाजाचे दिवशी (सुट्टीचे दिवस वगळून)  दि.२० डिसेंबर, २०१७ पर्यंत उपलब्ध असतील व सीलबंद अर्ज दि. २५ डिसेंबर २०१७ रोजी सांय.४.०० वाजेपर्यंत सादर करावेत, त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. सदर बातमी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsoahmednagar.blogspot.in ब्लॉगवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर दुरध्वनी क्रं.०२४१-२४७०४१५ येथे संपर्क साधावा.

००००००

Monday 13 November 2017

आंतरशालेय बॅंड स्पर्धा.

केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत पश्चिम विभागीय बॅंड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे पत्र व स्पर्धेच्या अटी खालील नमूद केलेल्या पत्रात दिलेल्या आहेत.





वरील नमूद पत्रातील अटींची पूर्तता करणा-या शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दि.१५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत नोंद करावी. या आंतरशालेय बॅंड स्पर्धाच्या राज्यस्तरीय स्पर्धा दि.१८ नोव्हेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विहीत मुदतीत या स्पर्धांसाठी आपली प्रवेशिका द्यावी, अशी विनंती आहे.