Tuesday 13 September 2016

जिल्हास्तर शालेय वुशू स्पर्धांचे आयोजन

अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतिने जिल्हास्तरीय व मनपा  वुशू स्पर्धेचे आयोजन खालील तार्खेनुसार करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तित जास्त खेळाडुंनी  स्पर्धेमधे सहभागी व्हावे


जिल्हास्तरीय शालेय
वुशु स्पर्धा-
दिनांक-16 sept. 2016

ठिकाण- श्री छत्रपती जूनियर कॉलेज ,सातेफळ रोड,
खर्डा, ता.जामखेड
रिपोर्टिंग -सकाळी 9.00 वा.


अहमदनगर मनपा शालेय वुशु स्पर्धा-
दिनांक -17 sept. 2016

ठिकाण-वाडीया पार्क ,जिल्हा क्रीडा संकुल , अहमदनगर
रिपोर्टिंग -सकाळी 9.00 वा.

Friday 2 September 2016

हॅन्डबॉल सुधारीत स्पर्धा कार्यक्रम



जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2016-17
हॅन्डबॉल सुधारीत स्पर्धा कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर द्वारा प्रतिवर्षी विविध क्रीडाप्रकारांचे गटनिहाय स्तरनिहाय क्रीडास्पर्धा आयोजन करण्यात येते.

हॅन्डबॉल अहमदनगर  जिल्हास्तर क्रीडाप्रकांराचा स्पर्धा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

.क्र
खेळ
वयोगट
दिनांक
क्षेत्र
स्पर्धास्थळ
1
हॅन्डबॉल
14,17,19,वर्षाखालील मुले
दि. १३ सप्टेंबर 2016
ग्रामीण
लिटील फ्लॉवर स्कूल,लोणी ता. राहाता.
14,17,19,वर्षाखालील मुली
दि. १४ सप्टेंबर 2016

          सर्व सहभागी शाळा/संघानी उपरोक्त स्थळ व दिनांकातील बदलाची नोंद घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे.

Saturday 20 August 2016

नवीन खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा तूर्त आयोजित होणार नाहीत



खालील नमूद खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा तूर्त आयोजित होणार नाहीत.

१. फिल्ड आर्चरी, २. कुडो, ३. रोपस्किपींग, ४. सिलंबम, ५. सॉफ्टटेनिस, ६. पॉवरलिफ्टींग, ७. लगोरी, ८. लंगडी, ९.रग्बी, १०.चॉकबॉल, ११.फ्लोअरबॉल, १२.युनिफाईट, १३.योगमुंडो, १४.फूटसाल, १५.टेनिस व्हॉलीबॉल, १६.कुराश, १७. बुडो मार्शल आर्ट, १८.पिकलबॉल, १९.कनोईंग व कयाकिंग, २०. हाफकिडो बॉक्सिंग, २१.थायबॉक्सिंग, २२.ड्रॉपबॉल, २३.सेपक टकरॉ, २४.टेनिक्वाईट, २५.टेनिसबॉल क्रिकेट, २६.वूडबॉल, २७.मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, २८.सायकलपोलो, २९.कार्फबॉल, ३०.मिनिगोल्फ, ३१.सुपर सेवन क्रिकेट, ३२.थांग-ता-मार्शल आर्ट, ३३.जित कुने दो, ३४.अष्टे-डू-अखाडा, ३५.जंपरोप, ३६.पेटान्क्यू, ३७.टारगेटबॉल, ३८.रस्सीखेच, ३९.म्युझिकल चेअर, ४०.वोविनाम, ४१.स्पोर्ट डान्स, ४२.स्पीडबॉल.

वरील नमूद खेळांच्या राज्य संघटनांनी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे असल्यास, खालील कागदपत्रे विभागीय उपसंचालक (राज्य संघटनेचे मुख्यालय ज्या विभागात आहे, त्या विभागीय उपसंचालकांकडे) यांच्याकडे सादर करावित.

१. राज्य संघटनेची नोंदणी प्रमाणपत्रे (१८६० व १९५०)
२. राज्य संघटनेची घटना व नियमावली.
३. राज्य संघटनेची अद्ययावत पदाधिकारी यादी, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांकासहित.
४. संघटनेची निवडणूक झाली असल्यास त्याचा परिपूर्ण अहवाल
५. राज्य संघटनेस संलग्न जिल्हा संघटनांची यादी, नोंदणी प्रमाणपत्रासहित.
६. राज्य संघटना आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचा गत ३ वर्षांचा सविस्तर अहवाल.
७. राज्य संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हा व राज्यस्तरीय पंच परीक्षेमधील उत्तीर्ण पंचाची जिल्हानिहाय यादी.
८. राज्य संघटनेच्या बॅंक खात्याचे मार्च-२०१६ पर्यंतचे सनदी लेखापालांचे (CA) लेखाविवरणपत्र.
९. राज्य संघटनेचे बॅंक बॅलन्स प्रमाणपत्र.
१०. राष्ट्रीय फेडरेशनचे संलग्नता प्रमाणपत्र
११. राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे मान्यता प्रमाणपत्र.
१२. राष्ट्रीय फेडरेशनला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे मान्यता प्रमाणपत्र
१३. सर्व स्तरावरील स्पर्धा आयोजन व सहभागाचा खर्च संघटना स्वतः करण्यास तयार असल्याचे शपथपत्र (१०० रु. स्टॅंप पेपरवर)

वरील सर्व माहिती दि.२५ ऑगस्ट, २०१६ पर्यंत सादर केल्यास सन २०१६-१७ च्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रकारामध्ये वरील नमूद १ ते ४२ खेळांचा समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल., त्यामुळे वरील जोपर्यंत नमूद १ ते ४२ खेळांचा समाविष्ट करण्याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा निर्णय प्राप्त होत नाही, तोपर्यंत या खेळांच्या शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार नाही.

जिल्हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर.

Friday 19 August 2016

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2016-17 सुधारीत स्पर्धा कार्यक्रम



जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2016-17
सुधारीत स्पर्धा कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर द्वारा प्रतिवर्षी विविध क्रीडाप्रकारांचे गटनिहाय स्तरनिहाय क्रीडास्पर्धा आयोजन करण्यात येते. खालील क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजनामध्ये तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात येत आहे.
बदल करण्यात आलेल्या क्रीडा प्रकांराचा सुधारीत स्पर्धा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

.क्र
खेळ
वयोगट
दिनांक
क्षेत्र
स्पर्धास्थळ
1
फुटबॉल
14,17,19,वर्षाखालील मुली
दि.24/08/2016
ग्रामीण
गौतम पब्लीक स्कूल, कोळपेवाडी ता.कोपरगांव
2
शुटींग
14,17,19,वर्षाखालील मुले मुली
दि.29 ते 31 ऑगस्ट 2016
ग्रामीण शहर
त्रिमुर्ती पब्लीक स्कूल, नेवासा फाटा ता. नेवासा
संपर्क- काळे सर-9011900653
3
लॉन टेनिस
14,17,19,वर्षाखालील मुले मुली
दि. 25 ते 26 ऑगस्ट 2016
ग्रामीण शहर
नगर क्लब,अहमदनगर
संपर्क श्री.उखळकर सर-9850849678
4
नेहरु हॉकी
15 17 मुले ,मुली
दि.29 ते 30 ऑगस्ट 2016
ग्रामीण
गौतम पब्लीक स्कूल, कोळपेवाडी ता.कोपरगांव
5
बॅडमिंटन
14,17,19,वर्षाखालील मुले
दि.29  ऑगस्ट 2016
ग्रामीण

ध्रुव अकॅडमी,संगमनेर ता.संगमनेर

14,17,19,वर्षाखालील मुली
दि.30  ऑगस्ट 2016
6
हॅन्डबॉल
14 मुले /मुली
24/09/2016
ग्रामीण
लिटील फ्लॉवर स्कूल,लोणी ता. राहाता
17 मुले /मुली
25/09/2016
19 मुले /मुली
26/09/2016
7.
तायक्वांदो
14,17,19,वर्षाखालील मुली
दि. 02 सप्टेंबर 2016
शहर मनपा स्तर
आंबेडकर सभागृह नवीन टिळक रोड,अहमदनगर
14,17,19,वर्षाखालील मुले
दि. 03 सप्टेंबर 2016
14,17,19,वर्षाखालील मुली
दि. 19 ते 20 सप्टेंबर 2016
ग्रामीण
जिल्हा क्रीडा संकुल,वाडीया पार्क,अहमदनगर
14,17,19,वर्षाखालील मुले
दि.21 ते 22 सप्टेंबर 2016
८.
बास्केटबॉल
14,17,19,वर्षाखालील मुले
२३ ते २४ ऑगस्ट, २०१६
शहर मनपा स्तर
आठरे पाटील पब्लिक स्कूल, अहमदनगर.
14,17,19,वर्षाखालील मुली
२४ ते २५ ऑगस्ट, २०१६
 सर्व सहभागी शाळा/संघानी उपरोक्त स्थळ दिनांकातील बदलाची नोंद घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी विनंती आहे.