Friday 29 July 2016

विषय: शालेय क्रीडा स्पर्धा व क्रीडा आयोजन सन २०१६-१७. तालुका व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा आयोजक शाळा,संस्था क्रीडा संघटना यांची आयोजन विषयक बैठक... बैठक शुक्रवार, दि.०५ ऑगस्ट, २०१५ रोजी दुपारी १२.३०



क्रीडा स्पर्धांच्या आयोजन यशस्वी होण्यासाठी सर्व आयोजन करणा-या शाळा/महाविद्यालय/ क्रीडा संघटना यांची बैठक शुक्रवार, दि.०५ ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीमध्ये आयोजन विषयक बाबींची माहिती, वेळापत्रक, माहिती पुस्तिका, प्रमाणपत्रे, स्पर्धा आयोजनानंतर द्यावयाचा अहवाल इ. बाबींविषयक चर्चा करण्यात येऊन, त्याबाबतची कागदपत्रे देण्यात येणार आहेत, तेंव्हा वरील नमूद बैठकीस सर्वांनी न चुकता उपस्थित राहून, शासकीय कार्यक्रमास सहकार्य करावे.

Wednesday 6 July 2016

स्पर्धा आयोजन बैठक कार्यक्रम



 क्रीडा युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर द्वारा प्रतिवर्षी शालेय खेलो इंडिया (ग्रामीण) क्रीडा स्पर्धांचे तालुका,जिल्हा,विभाग राज्य,राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते हे आपणांस विदित आहेच.
सन २०१६-१७ वर्षातील स्पर्धा आयोजन नियोजनात्मक बैठकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे निश्चीत करण्यात आलेला आहे.
स्पर्धा आयोजनपर बैठक कार्यक्रम


.क्र
तालुके
दिनांक
 वेळ
स्थळ
संगमनेर,अकोले,कोपरगांव
१९ जुलै २०१६
दु..०० वा.
श्रमिक महाविद्यालय, संगमनेर
कर्जत, जामखेड, श्रीगोंदा
दि.२० जुलै २०१६
दु.१२.३०वा.
समर्थ माध्य. उच्च माध्य. विद्यालय, कर्जत
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्र
दि.२१ जुलै २०१६

दु.१२.३०वा.
पेमराज सारडा महाविद्यालय,  अहमदनगर
राहुरी,राहाता,श्रीरामपूर
दि.२२ जुलै २०१६

दु.१२.३०वा.
.शिवाजी महाराज विद्यालय,राहुरी फॅक्टरी
नगर,पारनेर
दि.२५ जुलै २०१६

दु.१२.३०वा.
.शिवाजी इंजिनियरींग कॉलेज,नेप्ती ता. नगर
शेवगांव,पाथर्डी, नेवासा
दि.२६ जुलै २०१६

दु..०० वा.
रेसिडेन्शियल माध्य उच्च माध्य.विद्यालय,शेवगांव
 बैठकीचे विषय:
.सन २०१६-१७ ,या वर्षात आयोजित विविध क्रीडास्पर्धा बाबात माहिती चर्चा.
.तालुका क्रीडा प्रमुखांची नियुक्ती
.तालुका क्रीडा स्पर्धा शालेय ग्रामीण स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणे
.तालुका ,जिल्हा ,विभाग,राज्य स्पर्धा मागणीपत्रे सादर करणे.
. क्रीडा विभागाच्या विविध योजना उपक्रमाची क्रीडा मार्गदर्शिकेची माहिती.
सदर बैठकीसाठी आपल्या विद्यालय/.महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक/क्रीडाप्रमुख यांना उक्त कार्यक्रमाप्रमाणे बैठकीस उपस्थित राहणेकांमी आदेशित करुन कार्यमुक्त करावे त्यांचा हा कालावधी सेवाकाल समजण्यात यांवा.