माहिती अधिकार




जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर
केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये
 जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी/प्रथम अपिलीय प्राधिकारी/ द्वितीय अपिलीय प्राधिकारी यांची माहिती.
पदनाम व दूरध्वनी क्रमांक
:
अधिका-याचे नांव व कार्यालयीन पत्ता
जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२४१-२४७०४१५
:
श्री. उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर.
सहाय्यक जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२४१-२४७०४१५
:
श्री. डी.एम.देवकते , क्रीडा अधिकारी,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर.
प्रथम अपिलीय प्राधिकारी
दूरध्वनी क्र.०२०-२६६८८७३५
:
श्री. विजय संतान, उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे.
 ००००००
जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची  यादी.
अ.
क्र.
पदनाम
अधिका-याचे /
कर्मचा-याचे नांव
वर्ग
रुजु झाल्याचा दिनांक
संपर्कासाठी दुरध्वनी फॅक्स /ई.मेल
जिल्हा क्रीडा अधिकारी
श्री.उदय जोशी
०५.०७.२०१६
०२४१-२४७०४१५
तालुका क्रीडा अधिकारी
--

--"--
तालुका क्रीडा अधिकारी
--

--"--
तालुका क्रीडा अधिकारी
--

--"--
क्रीडा अधिकारी
श्री.नंदकुमार रासणे
ब (अराज)
१९.०६.२०१६
--"--
क्रीडा अधिकारी
श्री.डी.एम.देवकते
ब (अराज)
१४.१०.२०१५
--"--
क्रीडा अधिकारी
श्रीमती डी.सी.बोडके
ब (अराज)
२८.०६.२०१६
--"--
क्रीडा मार्गदर्शक
--


--"--
९.
क्रीडा मार्गदर्शक
श्री.ज्ञानेश्वर खुरंगे
ब (अराज)
२०.०६.२०१४
--"--
१०
क्रीडा मार्गदर्शक
श्री.ए.ई.लाकरा
ब (अराज)
०६.०६.२०१६
--"--
११
क्रीडा मार्गदर्शक
श्री.पी.जे.मंडले
ब (अराज)
१०.०६.२०१६
--"--
12
वरिष्ठ लिपीक
--

--"--
13
कनिष्ठ लिपीक
श्री.आर.एस.जगताप
२३.०९.२०११
--"--
14
शिपाई
श्री.बी.के.पवार
०५.०८.१९८१
--"--
००००००
भारतीय संविधानानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
१.
संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे;
२.
ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे;
३.
भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे;
४.
धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे;
५.
आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाने मोल जाणून तो जतन करणे;
६.
वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे;
७.
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे;
८.
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे;
९.
राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे;
१०.
मात्या-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा, यथास्थिती, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे;
ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्ये असतील.
००००००

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर.
नागरिकांची सनद
प्रस्‍तावना.
   
क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्‍याण विषयक उपक्रमांसाठी जागृती निर्माण व्‍हावी व महाराष्‍ट्र राज्‍यात क्रीडा संस्‍कृतीचा वारसा जपला जावा व त्‍याचे संवर्धन व्‍हावे यासाठी जुलै-१९७० मध्‍ये क्रीडा व युवक सेवा या स्‍वतंत्र संचालनालयाची स्‍थापना करण्‍याचा धोरणात्‍मक निर्णय राज्‍य शासनाने घेतला. 
            महाराष्‍ट्र राज्‍याचे स्‍वतंत्र असे क्रीडा धोरण असून, स्‍वतंत्र क्रीडा धोरण आखणारे हे देशातील पहिले राज्‍य आहे.  शासनाने नुकतीच क्रीडा धोरणामध्ये सुधारणा व वाढ करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. क्र.क्रीडाधो-२००६/ प्र.क्र.१६७/०६/क्रीयुसे-१, दि.२० फेब्रु २०१० अन्वये मा.मंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येऊन या समितीने नवीन क्रीडा धोरणांमधील ५८ महत्वपूर्ण शिफारसी केलेल्या होत्या. दि.२० एप्रिल २०१२ रोजी शासनाने क्रीडा धोरण २०१२ मान्यता दिलेली   आहे.
            शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.क्रीडाधो-2011/प्र.क्र.55/क्रीयुसे-1, दि.14 जून, 2012 अन्वये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ जाहीर झाले आहे.
                देशाचे युवा धोरण-२००3 मध्ये जाहीर करण्यात आले होते. राज्यातील युवांचा समुचित विचार करून महाराष्ट्र शासनाने युवक कल्याण क्षेत्राचा आढावा घेऊन तसेच युवक कल्याण क्षेत्रा झालेले बदल विचारात घेऊन शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.युकधो-2011/प्र.क्र.43/क्रीयुसे-3, दि.१४ जून, २०१२ अन्वये राज्याचे युवा धोरण-२०१२ जाहिर करण्यात आले आहे. 
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या महत्वाच्या योजना.
१.     अत्त्युच्च्य गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण.
२.     अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत.
३.     क्रीडा विषयक मूलभूत सुविधा विकसित करणे.- विभागीय/ जिल्‍हा/ तालुका क्रीडा संकुल.



//2//


४.     खेळाडूंना विविध सुविधा ( क्रीडा गुण सवलत, खेळाडू आरक्षण, शिष्यवृत्ती.
५.     शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
६.     क्रीडा विषयक पुरस्कार, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रोख  पारितोषिके.
७.     खेळाडूंसाठी प्रशिक्षण योजना.
८.     पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान.
९.     क्रीडा प्रबोधिनी. ( निवासी व अनिवासी )
१०. युवक कल्याण विषयक योजना.
विभागाची रचना.






संचालनालयाची रचना.

            शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासनस्‍तरावरील प्रशासनिक विभागाकडून मुख्‍यत्‍वेकरुन धोरणात्‍मक बाबींवर निर्णय घेण्‍यात येतो. शासन स्‍तरावर विभागाचे मंत्री/राज्‍यमंत्री (क्रीडा) यांचेबरोबर प्रशासनिक नियंत्रणाकरिता प्रधान सचिव/सचिव,  हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या अधिपत्‍याखाली विभागाकडे उप सचिव, अवर सचिव/ कक्ष अधिकारी  व इतर सहाय्यक कर्मचारीवृंद कार्यरत आहे.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मुख्‍यालय पुणे येथे आहे. या संचालनालयाचे आयुक्‍त/संचालक  हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी कार्यरत आहे. संचालनालयाच्‍या अधिनस्‍त मुंबई, नाशिक, पुणे, कोल्‍हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती या विभागाच्‍या ठिकाणी विभागीय कार्यालय असून, राज्यातील ३५ जिल्‍हयांमध्‍ये जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालये अशी संचालनालयाची रचना आहे.

            शासनस्‍तरावर महत्‍वाचे निर्णय/धोरणात्‍मक बाबी हाताळण्‍यात येतात. मात्र योजनांची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी संचालनालयाचे विभाग प्रमुख व संचालनालयाच्‍या अधिनस्‍त क्षेत्रिय स्‍तरावरील अधिका-यांमार्फत होते. संचालनालय व संचालनालयाच्‍या अधिनस्‍त विभाग व‍ जिल्‍हा कार्यालयांचा तक्‍ता सोबत जोडला आहे.









//3//


कार्यपूर्तीचे वेळापत्रक.         
            विभागाच्‍या महत्‍वाच्‍या योजना व धोरणात्‍मक बाबींवर शासनस्‍तरावर निर्णय घेण्‍यात येतात. मात्र शासन स्‍तरावर नागरिकांना थेट सुविधा देण्‍याचे कोणतेही उपक्रम राबविण्‍यात येत नाहीत. विभागाच्‍या विविध उद्दिष्‍टांची पूर्तता करण्‍याकरिता उपरोक्‍त क्षेत्रिय कार्यालयांकडून विविध योजनांमार्फत उपक्रम राबविण्‍यात येतात. या उपक्रमाची माहिती व त्‍याबाबतच्‍या कार्यपूर्ती वेळापत्रकाचा समावेश क्षेत्रिय कार्यालयातील नागरिकांच्‍या सनदेमध्‍ये स्‍वतंत्रपणे प्रसिध्द करण्‍यात येत आहे.

माहितीची सुलभता.
            आधुनिक काळाची गरज व विभागाची कामाची प्रचंड व्‍याप्‍ती विचारात घेता माहिती/उपक्रम dsoahmednagar.blogspot.in यार उपलब्‍ध केलेली आहे.


                                                                  
                                     

                                                                   जिल्हा क्रीडा अधिकारी
                                                                   अहमदनगर.


0 0 0 0 0 0



वाढीव गुण क्रीडा सवलत यादया पाठविणे.
1.      
सेवेचे नाव किंवा उपक्रम.
माध्यमिक शालांत (इ.१० वी) व उच्च  माध्यमिक शालांत (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबत...
2.      
उद्देश.
राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने, स्पर्धा कालावधीतील अनुपस्थितीमुळे अभ्यासक्रम बुडाल्याने इ.10वी इ.12वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
3.      
सेवा कोणास उपलब्ध होऊ शकते.
इ.10 वी इ.12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना.
4.      
सेवेच्या बाबी.
अधिकृत एकविध खेळाच्या राज्य संघटनांची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी व विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पाठविणे.
5.      
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ?
शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.एसएससी-२०१२/(१५४/१२)/उमाशि-२, दि.२१ एप्रिल, २०१५.
6.      
आर्थिक सहाय्य मर्यादा.
--
7.      
आर्थिक सहाय्य किती हप्त्यांमध्ये मंजूर करण्यात येईल.
--
8.      
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर
9.      
माहिती अर्ज किती प्रतीत कोणाकडे सादर करावा.
खेळाडूंनी त्यांचा अर्ज राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्वरीत मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे स्वाक्षरीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे तीन प्रतीत सादर करावा.
10.  
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत.
अर्जासोबत खेळाडूंने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले  व प्राविण्य मिळविलेले प्रमाणपत्र साक्षांकित करुन जोडावे.
11.  
सेवा मिळण्यास लागणारा कालावधी.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी ३० एप्रिल पर्यंत खेळाडूंचे अर्ज विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवावेत.
12.  
उपक्रमाची माहिती मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज सादर करावा.
मा.उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे.

00000


योजनेचे नाव :  राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन अनुदान.
1.
सेवेचे नाव किंवा उपक्रम
राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन अनुदान.
2.
उद्देश
महाराष्ट्र राज्यात क्रीडा खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या जिल्हा राज्य संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच इतर कार्यक्रमाबरोबर क्रीडा विकासाचे कार्य करणा-या संस्थांना महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य
3.
सेवा कोणास उपलब्ध होऊ शकते.
क्रीडा मंडळे, तालुका/जिल्हा/विभाग/राज्यस्तर संघटना
4.
सेवेच्या बाबी
क्रीडा स्पर्धा आयोजन खर्च.
5.
कोणत्या नियमानूसार कार्यवाही केली जाते.
शासन निर्णय,राक्रीधो-1096/प्र.क्रं.330/क्रीयुसे -1, दिनां 31 जुल 1997.
6.
आर्थिक सहाय्य मर्यादा
अ)    अधिकृत राज्यस्तरीय स्पर्धासाठी अनुदान- `1,00,000/- पर्यंत.
आ)   अधिकृत राष्ट्रीयस्तरीय स्पर्धासाठी अनुदान - `2,00,000/- पर्यंत.
इ)     अधिकृत आंतरराष्ट्रीयस्तरीय स्पर्धासाठी अनुदान - ` 2,00,000/- पर्यंत.
7.
आर्थिक सहाय्यक किती हप्त्यांमध्ये मंजूर करण्यात येईल.
एक
8.
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय.
9.
माहिती अर्ज किती प्रतीत कोणाकडॆ सादर करावा
अर्ज 2 प्रतीत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकड सादर करावा.
10.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत.
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेची मान्यता क्रमांक प्राप्त झाल्यानंतरच सदर योजनेचा लाभ घेता येतो.
1)      विहित नमुना अर्ज.
2)      संस्थेचा नोंदणी प्रमाणपत्र.
3)      म.रा. क्री.प. मान्यता क्रमांक प्रमाणपत्र.
4)      संस्थेच्या/मंडळाच्या पदाधिका-यांची पत्त्यासह यादी.
5)      स्पर्धेत सहभाग घेणारे (संघाची खेळाडूंच्या नांव यादी ) संघ / खेळाडूंची संख्या.
6)        स्पर्धेसाठी करावयाचा अंदाजित खर्च. (प्रपत्र जोडावे)
7)      राज्य/महासंघ यांनी सदर स्पर्धेस संमती दिली असल्यास (प्रपत्र जोडावे).
8)     राज्य संघटनेस संलग्न असलेले जिल्हे. (सोबत यादी जोडावी)
9)      खेळांच्या राज्य संघटना त्या त्या खेळाच्या महासंघास संलग्न असल्याचे प्रमाणपत्र
10)  गतवर्षी अनुदान प्राप्त झाल्याचे लेखाविवरणपत्र अनुदानाचे विनियोग प्रमाणपत्र.
11)  अधिकृत राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाप्रित्यर्थ अनुदान मंजूरीसाठी संबंधित संघटनेचे संमतीपत्र खर्चाचे अंदाजपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक.
12) स्पर्धा संपन्न झाल्यानंतर खालील कागदपत्र -
अ)  स्पर्धेचा सविस्तर अहवाल.
ब) स्पर्धेवर झालेल्या खर्चाचे परिक्षित लेखा विवरणपत्र. (फक्त स्पर्धेचे)
क) स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी झालेले खेळाडू/संघ यादी.
ड) स्पर्धाबाबतचे आवश्यक ते महत्वाचे 10 फोटोंचा अल्बम.
) जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा अभिप्राय.
11.
सेवा मिळण्यास लागणारा कालावधी
तरतदीच्या उपलब्धतेनूसार 45 दिवसात.
12.
उपक्रमाची माहिती मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज सादर करावा.
मा. आयुक्त, क्रीडा युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.




योजनेचे नाव : राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यासाठी अधिकृत राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य.
1.
सेवेचे नाव किंवा उपक्रम
राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यासाठी अधिकृत राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य.
2.
उद्देश
क्रीडा संस्कृतीची जोपासना वाढ करण्यामध्ये विविध खेळांच्या क्रीडा संघटनांचा महत्वाचा वाटा आहे. या संघटनांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन राज्याच्या क्रीडा धोरणानुसार विविध खेळांच्या राज्य संघटनांना राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य.
3.
सेवा कोणास उपलब्ध होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या मान्यता प्राप्त क्रीडा प्रकाराच्या अधिकृत राज्य संघटना.
4.
सेवेच्या बाबी
अ) खेळाडू, प्रशिक्षक यांचा निवास भोजन खर्च प्रत्येकी प्रतिदिन ` 60/- पेक्षा जास्त नसेल.
ब) खेळाडू, प्रशिक्षक यांचा प्रवास खर्च.
क) क्रीडागंणाची देखभाल भाडॆ.
ड) आवश्यक क्रीडा साहित्य.
5.
कोणत्या नियमानूसार कार्यवाही केली जाते.
शासन निर्णय -  राक्रीधो-1096/ प्र.क्रं.330/क्रीयुसे-1, दि.31 जुलै,1997.
6.
आर्थिक सहाय्य मर्यादा
प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल `15,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल.
7.
आर्थिक सहाय्यक किती हप्त्यांमध्ये मंजूर करण्यात येईल.
एक
8.
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय.
9.
माहिती अर्ज किती प्रतीत कोणाकडॆ सादर करावा
2 प्रतीत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा.
10.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत.
1)      विहित नमना अर्ज.
2)      प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या (यादी सोबत जोडावी.)
3)      राज्य संघटनेने प्रत्यक्ष खर्च केलेल्या खर्चाचा बाबनिहाय तपशिल.
अ) खेळाडूंचा निवासस्थानापासून ते प्रशिक्षण शिबीर स्थळापर्यंतचा प्रवास खर्च.
ब) खेळाडूं/ प्रशिक्षकांचा निवास भोजन खर्च.
क) प्रशिक्षकांचा प्रवास दैनिक खर्च.
ड) क्रीडांगणावरील खर्च
ई) क्रीडा साहित्य खरेदी (यादी पावती सोबत जोडावी.)
4)      गतवर्षी अनुदान मंजुर करण्यात आले असल्यास विनियोग प्रमाणपत्र लेखाविविरपत्र.
5)      प्रतिज्ञापत्र.
6)      जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारस पत्र.
11.
सेवा मिळण्यास लागणारा कालावधी
तरतदीच्या उपलब्धतेनसार 30 दिवसात.
12.
उपक्रमाची माहिती मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज सादर करावा.
मा.आयुक्त, क्रीडा युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.




योजनेचे नाव : अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे संघ सहभागी होण्यासाठी राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य.
1.
सेवेचे नाव किंवा उपक्रम
अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे संघ सहभागी होण्यासाठी राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य.
2.
उद्देश
महाराष्ट्रातील गुणवान खेळाडूंना विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धात राज्याचे प्रतिनिधित्व करणे सुलभ व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदरहू योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत संबंधित राज्य संघटनांना राज्याचे संघ, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आर्थिकदृष्टया सक्षम नसणाऱ्या संघटनांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्या-या संघांना अर्थिक मदत करण्यात येते.
3.
सेवा कोणास उपलब्ध होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या मान्यता प्राप्त क्रीडा प्रकाराच्या अधिकृत राज्य संघटना.
4.
सेवेच्या बाबी
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणेकरिता खर्चाच्या बाबी. उदा. - प्रवास, हातखर्ची,गणवेश ट्रॅकसूट खर्च.
5.
कोणत्या नियमानूसार कार्यवाही केली जाते.
शासन निर्णय-राक्रीधो-1096/प्र.क्रं.330/क्रीयुसे -1, दि.31 जुलै, 1997
6.
आर्थिक सहाय्य मर्यादा
1)   प्रवास खर्च - सवलतीच्या दराने दुस-या वर्गाचे रेल्वे भाडॆ किंवा एस.टी.चे सवलतीचे प्रत्यक्ष भाडे.
2)   हातखर्ची भत्ता - प्रत्येक खेळाडू व्यवस्थापक/मार्गदर्शक यांना दरदिवशी प्रत्येकी `40/- प्रमाणॆ प्रवास प्रत्यक्ष स्पर्धेच्या कालावधीसाठी.
3)   खेळाचा गणवेश स्पोर्टस किट - सहभागी खेळाडूंना प्रत्येकी `150/- प्रमाणॆ.
4)   ट्रॅकसूट - सहभागी खेळाडूंना प्रत्येकी ` 500/- प्रमाणॆ.
7.
आर्थिक सहाय्यक किती हप्त्यांमध्ये मंजूर करण्यात येईल.
एक
8.
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय.
9.
माहिती अर्ज किती प्रतीत कोणाकडॆ सादर करावा
अर्ज 2 प्रतीत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडॆ सादर करावा.
10.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत.
1)      विहित अर्ज
2)      राज्य संघटना राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असल्याबाबतचे पत्र
3)      संघटना नोंदणी प्रमाणपत्र.
4)      राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू, व्यवस्थापक/ मार्गदर्शक यांचे नावांची यादी.
5)      राष्ट्रीय स्पर्धेच्या सहभागाप्रित्यर्थ झालेला एकूण खर्चाचा तपशी -
अ)    सवलतीच्या दराचे प्रवास भाडॆ.
आ)  गणवेश खर्च
इ)      ट्रॅकसूट खर्च
6)      गतवर्षी अनुदान मंजूर झाले असल्यास आर्थिक सहाय्याचे विनियोग प्रमाणपत्र.
11.
सेवा मिळण्यास लागणारा कालावधी
तरतदीच्या उपलब्धतेनसार 45 दिवसात.
12.
उपक्रमाची माहिती मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज सादर करावा.
मा. आयुक्त, क्रीडा युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.



योजनेचे नाव : एकविध खेळाच्या राज्यसंघटनांना प्रोत्साहनात्मक अनुदान.
1.
सेवेचे नाव किंवा उपक्रम
एकविध खेळाच्या राज्य संघटनांना प्रोत्साहनात्मक अनुदान.
2.
उद्देश
राष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्राचे संघ विविध खेळात नेत्रदिपक अशी कामगीरी बजावित असतात. परंतू त्यांच्या या कार्याचे योग्य मुल्यमापन होत नाही. तसेच राज्य संघटनेच्या आर्थिक कमकुवत परिस्थितीमुळे त्या त्या खेळांचा मोठया प्रमाणावर प्रचार प्रसार करणे त्यांना शक्य होत नाही. या गोष्टीचा साकल्याने विचार करुन सदर योजनेसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. या अनुदानाचा उपयोग संबंधित राज्य संघटनेने राज्यात खेळाचा विकास करण्याकरिता करणे आवश्यक आहे.
3.
सेवा कोणास उपलब्ध होऊ शकते.
इंडियन ऑलिम्पींक असोसिएशन महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनद्वारा मान्यता प्राप्त खेळांच्या राज्य संघटना प्रोत्साहनात्मक अनुदानास प्राप्त समजण्यात याव्यात.
4.
सेवेच्या बाबी
अनुदान मंजुरी आदेशाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत खाली नमुद केलेल्या एक किंवा अनेक बाबीबर करणे आवश्यक आहे.
अ) संबंधित खेळाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.
ब) संबंधित खेळाचे क्रीडा साहित्य प्रशिक्षण साहित्य खरेदी
5.
कोणत्या नियमानूसार कार्यवाही केली जाते.
शासन निर्णय क्र.राक्रीधो-1096/प्र.क्र.330/क्रीयुसे-1, दि.31 जुलै, 1997.
6.
आर्थिक सहाय्य मर्यादा
    खेळ                  सुवर्ण              रौप्य               कास्य
1) सांघिकखेळ   `15,000/-     `10,000/-    `5,000/-
2) वैयक्तिकखेळ  ` 3,000/-    `2,000/-      `1,000/-
7.
आर्थिक सहाय्यक किती हप्त्यांमध्ये मंजूर करण्यात येईल.
एक
8.
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय.
9.
माहिती अर्ज किती प्रतीत कोणाकडॆ सादर करावा
2 प्रतीत अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा.
10.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत.
1.     विहित नमूना अर्ज
2.     संबांधित खेळाच्या राष्ट्रीय महासंघास संलग्न असल्याबाबतची कागदपत्रे
3.     संघटनेला संलग्न असणा-या जिल्हा संघटनांची यादी जोडावी.
4.     चालू आर्थिक वर्षातील संस्थेच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची यादी
5.     राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सन ------------ मध्ये संपादन केलेल्या कामगिरीचा तपशिल
6.     स्पर्धेतील कामगिरीबाबत खेळाडूंच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत राजपत्रित
7.     गतवर्षी प्रोत्साहनात्मक अनुदान मंजूर झाले असल्यास अनुदानाचे विनियोग प्रमाणपत्र
8.     प्रतिज्ञापत्र.
9.     जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारश पत्र
11.
सेवा मिळण्यास लागणारा कालावधी
तरतूदीच्या उपलब्धतेनूसार 30 दिवसात. 
12.
उपक्रमाची माहिती मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज सादर करावा.
मा.आयुक्त/संचालक, क्रीडा युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.


















































No comments: