Monday 4 July 2016

सुस्वागतम्‌



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर
द्वारा संचलीत
आपले या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करीत आहे.

आजपासून आपण क्रीडा विषयक सर्व बाबी या ब्लॉगद्वारे खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, क्रीडा पत्रकार यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लवकर जिल्हा क्रीडा कार्यालयाची वेबसाईट करण्याचा मानस आहे, त्याद्वारे ऑनलाईन प्रवेशिका, ऑनलाईन निकाल, ऑनलाईन प्रमाणपत्र इ. बाबींच्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील. त्यासाठी थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत हा ब्लॉग.

हा ब्लॉग आपण नित्य नेमाने पहावा, याद्वारे व यावर प्रकाशित होणा-या सर्व बाबी अधिकृत असणार आहेत.

आपण जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या या उपक्रमास भरभरुन प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे.
आपण प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा नव्हे खात्रीच आहे.
००००००

No comments: